- उच्चभ्रू सोसायटीतील प्रकार; दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च २०२३) :- ” तु इथुन बाहेर निघून जा, नाहीतर मी तुला मारुन टाकीन ” अशी आरोपीने फिर्यादीला धमकी दिली. आरोपीने दोन महीलांना सोसायटीतील त्याच्या फ्लॅटमध्ये आणून ठेवले होते. त्या महीला कोण आहेत याबाबत फिर्यादीने आरोपीला विचारणा केली. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला हिंदीतुन शिव्या दिल्या. तसेच सकाळच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या फ्लॅटमध्ये जात असताना त्यांना आरोपीने ओढले व त्यांच्याबरोबर अश्लील कृती केली. त्यावेळी फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ५) रोजी सकाळी ५.३० ते ८.३० च्या दरम्यान विरा ऑस्टेलो, २५७/७/१७ हिंजवडी फेज १ येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी केषु मधुसुदन रेडडी (पत्ता माहीत नाही), आरोपीच्या भावाचा मेहुणा व्यंकटेश वरतु रेडडी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी दोघांच्या विरोधात १८६/२०२३ भा.दं.वि.सं.कलम ३५४,५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


















