न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च २०२३) :- गुलालासोबत कोरड्या रंगांची मुक्तपणे उधळण करत तसेच गीत – संगीताच्या तालावर उत्साहाने नृत्य करत पिंपळे सौदागर येथील साईपर्ल सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांनी रंगपंचमी साजरी केली.
प्रारंभी सोसायटीच्या प्रांगणात एकत्र येऊन सर्वांनी होलिकोत्सवानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देऊन गुलालाची उधळण केली. साऊंड सिस्टिमवर गाणे लावून ‘ रंग बरसे भिगे चुनरिया रंग बरसे ‘, ‘ होली खेले रघुवीरा..’, ‘ खेळताना रंग बाई होळीचा , ‘ झिंग झिंग झिंगआठ, ‘ नाटो नाटो ‘ या आणि इतर गाण्यांवर मनसोक्त नाच करत ज्येष्ठ नागरिकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
श्रीकांत माने यांच्या आयोजनाखाली झालेल्या या रंगारंग कार्यक्रमात दिपू शेठ, मेघानी, आठवले, निकेश कुमार, राऊत, नांदगावकर ,फुलवाले, नंदनवार, अरविंद माने, गुप्ता, बोमीडवार, देशमुख ,कांबळे ,राणे, सुमय्या, न्यायाधीश ,चौधरी, काटे, दासानी, अगरवाल, शहा, त्रिवेदी, सिंग, भाले, गुप्ता, जाधव, बजाज, भिरुड, काटकर आदींनी सहभाग नोंदविला. अल्पोपहार आणि चहापानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.















