न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च २०२३) :- धुलीवंदन सणाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून आज मंगळवारी (दि. ७) रोजी ड्रंक अँड ड्राइव्हची विशेष मोहिम राबविण्यात आली.
एकुण ४८ वाहन चालक हे मद्यप्राशन करुन वाहन चालवितांना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस दाखल करण्यात आले असुन केसेस न्यायालायत दाखल करण्यात येणार आहेत.
धुलिवंदनाच्या दिवशी मोठया संख्येने नागरिक मद्यप्राशन करून वाहने वेगात व धोकादायक रित्या चालवुन अपघात करुन स्वतःच्या तसेच इतरांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण करतात. अशा वाहन चालकांना वेळीच प्रतिबंध करणे गरजेचे असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे तसेच पोलीस उप आयुक्त काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक शाखेमार्फत मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात दिवसभर ड्रंक अँड ड्राइव्हची विशेष मोहिम राबविण्यात आली.
वाहन चालकांनी मद्यप्राशन न करता वाहने चालवुन होणारी न्यायालयीन कार्यवाही टाळावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.















