- लहान मुलाच्या प्रियेसीबद्दल अपशब्द काढल्याचा घेतला बदला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च २०२३) :- लहान मुलाचे प्रेमसंबंध असलेल्या मुलीविषयी आरोपीच्या मयत वडीलांनी (मयत अशोक रामदास जाधव, वय ४५ वर्षे) वाईट शब्द उच्चारले. याचा राग मनात धरून आरोपीने वडिलांचा घरातील दोरीने त्यांचा गळा आवळून खून केला. आरोपीच्या वडिलांच्या नाका तोंडातून फरशीवर पडलेले रक्ताचे डाग मयताच्या आरोपी पत्नीने मयताच्या अंगातील शर्टाने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मयताच्या आरोपी मोठ्या मुलाने घराच्या वलनीस बांधलेली दोरी फॅनला गुंडाळून मयताने गळफास घेवून आत्महत्या केली आहे, असा बनाव रचला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ५) रोजी ९.०० च्या सुमारास ताराबाई जाधव यांच्या खोलीत भाडयाने, तनिष होम्सच्या पाठीमागे, समर्थ सदन बिल्डींग दुसरा मजला, दिघी येथे घडला.
फिर्यादी अशोक काशीनाथ खंडाळे (वय ५५ वर्षे, धंदा श्रेणी उपनिरीक्षक, रा. जुनी पोलीस लाईन, बि.नं. ई ७४, शिवाजीनगर, पुणे) यांनी आरोपी मयताची पत्नी, मयताचा मोठा मुलगा राहूल अशोक जाधव (वय २५ वर्षे), मयताचा लहान मुलगा अनिल अशोक जाधव (वय २३ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी तिघांच्या विरोधात ९४/२०२३ भादवि क. ३०२.२०१,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.















