न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मार्च २०२३) :- टाटा ट्रक (जीजे १५ अव्ही ९९५८) मधील माल फिर्यादी (दि. ६) हे मोशी गोडावनमध्ये उतरून चाकण तळेगावगाव रोडने पनवेलकडे जात होते. तळेगाव दाभाडे मच्छी मार्केट समोर अंदाजे ८.३० च्या सुमारास फिर्यादीच्या मागुन डाव्या बाजुने आलेल्या आरोपीच्या आय २० कारला ट्रकच्या मागील उजवी बाजू घासली. त्यावरून आरोपीने फिर्यादीला गाडी साईटला घेण्यास सांगितले. फिर्यादी हे बसलेल्या ड्रायव्हर बाजुकडे येवुन आरोपींनी शिवीगाळ करीत ‘खाली उतर तुझ्यामुळे आमच्या गाडीचे नुकसान झाले आहे’ असे म्हणत फिर्यादीला खाली ओढून हाताने मारहाण केली. त्यातील एकाने फिर्यादीकडील ५,००० रुपये किंमतीचा रिअलमी सी-११ कंपनीचा मोबाईल बळजबरीने खिशात हात घालून घेतला.
दुस-याने फिर्यादीच्या खिश्यातील पर्स व त्यामधील ४,५०० रूपये असे एकुण ९,५०० रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावुन घेत पळ काढला, असे फिर्यादीत म्हटलं आहे.
फिर्यादी मुकेश रामनाथ यादव (वय ४५ वर्ष रा. बरीयारामपुर पो. सोरोकटरा बझार ता. हाडीया जि. इलाहाबाद, उत्तर प्रदेश) यांनी आरोपी गाडी (एमएच१४एचडब्ल्यू २०७०) आय २० वरील चालक व त्याचा मित्र याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपींविरोधात ११३/२०२२ भा.दं.वि कलम ३९२,३२३, ५०४,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.















