न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मार्च २०२३) :- शौचालयाचा दरवाजा उघडत असताना आरोपीने फिर्यादीस ‘मी येवुका आत’ असे म्हणत फिर्यादी महिलेचा उजवा हात धरला. महिलेच्या मन्नास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून त्यांचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटलं आहे.
ही घटना (दि. ७) रोजी दुपारी ३.४५ च्या सुमारास सार्वजनिक शौचालय, अण्णाभाऊ साठे वसाहत, से.नं. २२ निगडी येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी सनी ज्ञानेश्वर क्षिरसागर (वय अंदाजे २५ वर्ष, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, से.नं. २२ निगडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी आरोपी विरोधात १३८/२०२३ भा.दं.वि. कलम ३५४ पोक्सो २०१२ कलम ७, ८ अन्वये गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेतले आहे.















