- कर्नाटकमधील दोघांना कारसह अटक; वाकड पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मार्च २०२३) :- थेरगावातील आदित्य बिर्ला हॉस्पीटल येथील स्टाफ क्वार्टर समोरील रस्त्याच्या कडेला टाटा इंडिका कारमध्ये दोघांनी बेकायदेशीररीत्या ९ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी स्वतः जवळ बाळगला. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी (दि. ७) रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास कारवाई करीत दोघांना अटक केली.
दोघांकडून २,३१,५०० रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ, २०,००० चे दोन मोबाईल, ७४० रुपये रोख रक्कम व पाच लाखांची कार असा एकूण ७,५२,२४० रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.
राहुल विठ्ठल जाधव (वय २२ वर्षे, रा. व्हि. के. सलगरतांडा, ता. कमलापूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक), शालीवान आप्पाराव वाडी (वय ३२ वर्षे, जन्म दि. ०१/०२/१९९१, रा. संगमेश्वर मंदिराजवळ, मुद्दडगा, ता. कमलापूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलिसांनी दोघांच्या विरोधात २३६/२०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















