न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील संत तुकाराम महाराज बीज निमित्त त्यांच्या संत तुकाराम नगर तसेच भक्ती-शक्ती चौक निगडी येथील पुतळ्यास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संत तुकाराम नगर, पिंपरी येथील कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, अण्णा बोदडे, उप अभियंता संतोष दुर्गे, सहाय्यक आरोग्याधिकारी
बाबासाहेब कांबळे, सामाजिक कार्यकर्ते नंदु कदम, माणिकराव अहिरराव, हरिभाऊ करमळकर, लक्ष्मण खाडे हे उपस्थित होते. तर निगडी येथील कार्यक्रमास उप आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सचिन चिखले, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे जीवन बोऱ्हाडे, सागर तपकीर आदी उपस्थित होते.












