न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२३) :- अंडा बुर्जीची गाडी बंद करत असताना आरोपी तिथे आले. फिर्यादीकडे हातगाडी लावण्यासाठी ५०० रुपये हप्त्याची मागणी केली. फिर्यादींनी त्यास हप्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने फिर्यादीस हाताने मारहाण केली. त्याच्या कमरेचा लोखंडी कोयता हातामध्ये घेवुन फिर्यादीस शिवीगाळ केली. त्या कोयत्याने फिर्यादीच्या हातगाडीवरील अंडयाचे ट्रे तोडुन अंडी फोडुन गाडीवरील साहीत्य फेकुन देवुन फिर्यादीचे नुकसान केले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ७) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास क्रांती चौक, ब्रिजखाली, स्पाईन रोड, मोशी येथे घडली.
फिर्यादी सचिन विलास कदम (वय ३३ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. दत्त हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) यांनी आरोपी सुनिल ऊर्फ अण्णा पिसाळ (रा. मोशी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ८४/२०२३ भा.दं.वि. कलम ३८४, ३२३, ४२७,५०४ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), (२७) महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१), (३) सह १३५ नुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















