न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२३) :- मैत्रीचे रुपांतर आरोपीने प्रेमसंबंधात केले. फिर्यादीला लग्नाचे अमिश दाखवले. त्यांना धमकावुन जबरदस्तीने वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले. फिर्यादीच्या अकाऊंटमधुन फोन पे दवारे पैसे काढुन फिर्यादीची फसवणुक केली.
ही घटना (दि. २९/८/२०२२ पासुन दि. १०/०२/२०२३) दरम्यान क्षेत्रिय लॉज, चिंचवड व फिर्यादीच्या राहत्या घरी पत्राशेड, अजंठानगर, चिंचवड येथे घडली.
महिला फिर्यादी यांनी आरोपी रणजित संजय सपकाळ (वय अं. २८ वर्ष, रा. क्षेत्रिय हॉटेल, चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १४९ /२०२३ भा.दं.वि. कलम ३७६, ३७६ (२) एन, ४२०,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















