- कोरोनामुळे शहरातील उत्तर भारतीयांची हानी; ‘होली मिलन’ मुळे काहीसा दिलासा – विजय गुप्ता..
- श्री गुप्ता आणि जैस्वाल ऑल इंडिया फाउंडेशनचा कार्यक्रमासाठी पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२३) :- ” देवा श्री गणेशा, तेरी आखा का यो काजल, कारभारी दमानं ” या गाण्यांवर भन्नाट डान्स करीत युवक, मुलं, महिला आणि जेष्ठ नागरिकांनी होळीच्या रंगात न्हाऊन ‘ हैप्पी होली ‘ आणि ‘ महिलांनी हैप्पी वूमन्स डे’ म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

उत्तर भारतातील राज्यभरात विखुरलेला गुप्ता परिवार एकत्र आणत दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गुप्ता आणि जैस्वाल ऑल इंडिया फाउंडेशन, काळभोरनगर येथील हनुमान मित्र मंडळाच्या वतीने ‘होली मिलन’ हा सांकृतिक समारोह यमुनानगरमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावेळी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थितांनी गाणी, डान्स, गेम्स आणि जेवनाचा मनमुराद आनंद लुटला. महिलांचा गुलाबी अन पुरूषांचा आकर्षक भगवा फेटा लक्ष वेधून घेत होता. यावेळी लहान मुली, तरुण मुलं आणि महिलांनीदेखील स्टेजवर नृत्य करीत कार्यक्रमात ‘माहोल’ तयार केला. संगीत खुर्ची, डान्स तसेच इतर स्पर्धेतील सहभागी विजेत्या महिला, मुली यांना आकर्षक बक्षीसांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक विजय गुप्ता, जितेंद्र गुप्ता, देवानंद गुप्ता, वकील गुप्ता, उमाशंकर गुप्ता, अशोक गुप्ता यांनी दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी रचना गुप्ता, पौर्णिमा गुप्ता, प्रेरणा गुप्ता, श्रिया गुप्ता, सृष्टी गुप्ता, आर्य गुप्ता, मधु गुप्ता, पूनम गुप्ता, साधना गुप्ता, शीला गुप्ता, रागिणी गुप्ता, सरोज गुप्ता, रत्ना गुप्ता, रिंकू म गुप्ता, सनी गुप्ता, प्रज्वल गुप्ता, शिवम गुप्ता, सूरज गुप्ता, शुभम सरपाले, महिला वर्ग आणि तरुणाई मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाले होते.
आयोजक विजय गुप्ता म्हणाले, होळी हा रंगांचा सण आहे. ज्यामध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी होऊन हा दिवस एकत्र आनंदाने साजरा करतात. कोणताही भेदभाव न करता बंधुभावाने सर्व सणांचा आनंद लुटतात. कोरोनामुळे पिंपरी चिंचवड शहरातील उत्तर भारतीय बांधवाची अतोनात हानी झाली. त्यातून त्यांना बाहेर काढून एकत्र आणण्यासाठी ‘होली मिलन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एकमेकांबद्दल आपुलकी आणि जवळीक त्यांना उभारी घेण्यासाठी महत्वाची आहे. येणाऱ्या काही काळात युवकांना आमचे कार्य पुढे न्यायचे आहे. भविष्यात समाजासाठी सामुदायिक विवाह सोहळे आणि इतरही सामजिक उपक्रम राबविण्यावर आम्ही श्री गुप्ता आणि जैस्वाल ऑल इंडिया फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भर देणार आहोत.
















