न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२३) :- त्रिशुल सिक्युरीटी कंपनीमध्ये फिर्यादी व आरोपी हे कामाला आहेत. दरम्यान आरोपी हा दुचाकीवरून आला. फिर्यादीचा हात पकडुन, तुझी लायकी देखील नाही, ये आई घाले, तु छिनाल, रांड आहे ‘ असे बोलून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तु येथे कशी काय कामाला राहते तेच बघतो, अशी धमकी दिली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ५) रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास रिजेन्सी याची बंद पडलेली बिल्डींगची साईड, जिजामाता चौक ते खांडगे पेट्रोलपंप या रोडवर रिलायन्स मॉलसमोर, तळेगाव दाभाडे येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी सतेज येवले (वय ३७, रा. पैसा फंड काच कारखान्याजवळ, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी ११८/२०२३ भादंवि कलम ३५४,५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


















