न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२३) :- भाडेकरु व शिवाजी पाटील यांचे भांडण सोडविण्यासाठी घरमालक फिर्यादी गेले. फिर्यादी यांनी आरोपी भाडेकरूला खोली खाली करण्यास सांगीतले. त्यावरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्यात ब्लॉक मारुन त्यांना जखमी केले. आरोपी तिघांनी दगडाने फिर्यादी यांच्या पाठीवर, गालावर, उजव्या हातावर, खांदयावर मारुन त्यांना जखमी केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि ७) रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास म्हसोबा मंदीर जवळ, सदगुरुनगर, भोसरी येथे फिर्यादीच्या बिल्डींग समोर घडली.
फिर्यादी प्रसाद सुदाम चोरघे (वय ४० वर्ष, धंदा कंन्स्ट्रक्शन, रा. ग्लोरीअस पार्क, रु.नं. ए/२२, इंद्रायणीनगर, सेक्टरनं. २, भोसरी) यांनी आरोपी विजय पवळे, राजेश पवळे, अजय पवळे (सर्व रा. सदगुरुनगर भोसरी), एक अनोळखी इसम (नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी चौघांच्या विरोधात २१०/२०२३, भा.दं.वि. कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















