- पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२३) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या उपाध्यक्षा अनिता संदीप काटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शाळेच्या संचालिका निहारा काटे, लीना काटे उपस्थित होत्या. केक कापून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
शाळेच्या उपाध्यक्षा अनिता संदीप काटे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे यांचे कर्तृत्व महिलांनी अभ्यासावे. समाजातील एक स्त्री शिक्षित झाली की, एक कुटूंब शिक्षित होते. समाजात परिवर्तन घडवून आणते. यासाठी सर्वांनी शिक्षण घेणे, वाचन करणे आवश्यक आहे. सर्व महिलांमधे वाचन संस्कृती व मूल्ये वाढीस लागावीत यासाठी महिलांना पुस्तकांचे वाटप केले आहे.
यावेळी लीना काटे यांनीही महिलांच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल प्रशंसोद्दगार काढले. प्रीती तळेकर, दिप्ती बक्षी, सीमा सरदेसाई आणि आदिती चितळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सर्व उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला.