- गुजरात आणि शहरातील तब्बल ३२ गुन्हे उघडकीस; वाकड पोलिसांची धडकेबाज कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२३) :- गुजरातमधील १६ गुन्हयात फरार असणाऱ्या घरफोडीतील दोन सराईत गुन्हेगारांना अटक करीत त्यांच्याकडून तब्बल ६० तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम, मोटार सायकली मिळुन एकुण २४,६८,४०० रुपयांचा मुददेमाल वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने हस्तगत केला आहे. त्यासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एकुण १६ घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणले आहेत.
वाकड, कावेरीनगर पोलीस वसाहतीतील फ्लॅट नं ८, बिल्डींग नं २० या शासकिय निवासस्थानातील घराचा अज्ञात चोरटयाने दरवाजाचा कोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरातील बेडरुममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधुन घरफोडी चोरी करून एकूण ६,२८,५०० रुपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे दागीने व रोख रक्कम चोरी केली होती. या प्रकरणी आरोपींवर (दि. १७/०२/२०२३) रोजी वाकड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५२/२०२३ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपींना अटक करून गुन्हा उघड करण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड यांनी तपास पथकातील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व तपास पथक अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपीना अटक करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घरफोडी चोराबाबत माहिती प्राप्त करण्यासाठी तांत्रिक तपास व पांरपारिक गोपनिय बातमीद्वारे माहिती प्राप्त करून तपास सुरू केला. त्याकरिता अनेक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. तसेच रात्रीचे सापळे रचण्यात आले.
तपासा दरम्यान पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोहवा. प्रमोद कदम यांना विश्वासु बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, घरफोडी चोरी करणारे दोन चोरटे रावेत परिसरात येणार आहेत. तात्काळ सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण स्टाफसह प्राप्त माहितीच्या अनुषंगाने रावेतमधील शिंदेवस्ती गणपती मंदिराजवळ रवाना झाले. काही वेळात त्या ठिकाणी प्राप्त माहितीच्या वर्णनाचे दोन इसम एका यामाहा एफ झेड मोटार सायकल (एमएच ०४ एफवाय ६७७२) वरून घटनास्थळी आले. पोलीसांची चाहुल लागताच आरोपी त्या ठिकाणावरुन पळुन जाण्याचा प्रयत्न करित असतांना संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांनी सोबतच्या स्टाफसह शिताफिने त्यांना ताब्यात घेतले. दोघांचे नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे लखनसिंग क्रिपालसिंग सरदार (वय २८ वर्षे), सतपालसिंग क्रिपालसिंग सरदार (वय २६ वर्षे, दोघेही रा. घासकौर दरवाजा, वासूदेव लाठीच्या समोर, वडनगर, जि. म्हैसाना, राज्य गुजरात) असे सांगितले. त्यातील सतपालसिंग याच्या खांद्यावर अडकविलेल्या सँगमध्ये एक लोखंडी कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, पोपट पान्हा असे साहित्य मिळून आले. त्यामुळे दोन्ही इसम घरफोडी करणारे आरोपीच असल्याचे खात्री झाली. आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली असुन (दि. १३) पर्यंत दोघांना पोलीस कोठडी प्राप्त झाली आहे.
दोन्ही आरोपी हे सख्खे भाऊ असुन आरोपी यांनी गुजरात राज्यात घरफोडी चोरीचे एकुण १६ गुन्हे केले असुन सदर गुन्हयात ते फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुजरात पोलीस विशेष करून म्हैसाना व पाटण एल.सी.बी. त्यांचा शोध घेत आहे. आरोपीकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्यांनी पिंपरी चिंचवड परीसरातील घरफोडी चोरीचे एकुण १५ व वाहन चोरीचा ०१ गुन्हा असे एकुण १६ गुन्हयांची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींकडुन एकुण २४,६८,४०० रुपये किंमतीचे सोन्याचे, चांदीचे दागिणे व रोख रक्कम तसेच गुन्हा करतांना वापरण्यासाठी चोरी केलेली मोटार सायकल असा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मनोज लोहीया सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त, परि २, श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे-१, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे-२, सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफोविभीषण कन्हेरकर, सपोफो. बाबाजान इनामदार, सपोफी. राजेंद्र काळे, सपोफी राजेंद्र मारणे, पोहवा. वंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा प्रमोद कदम, पोहवा संतोष बर्गे, पोहवा. दिपक भोसले, पोना प्रशांत गिलबीले, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना. राम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि. तात्या शिंदे, पोशि कोर्तेय खराडे, पोशि. भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि. सौदागर लामतुरे, पोशि विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.
















