- ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत सप्लायर्सच्या दुकानाची तोडफोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२३) :- जुन्या भांडणाचा राग मनात धरला. फिर्यादीचा कामगार अनिश मुरकुटे याचा भाऊ सौरव मुरकुटे याच्याशी सह आरोपी ३ याच्या भावासोबत भांडण झाले होते. या कारणावरून सह आरोपी ३ याच्यासह मुख्य आरोपी, सह आरोपी २, सह आरोपी ४ व इतर ३ ते ४ जण हे ५ ते ६ मोटार सायकलवरून हातात कोयते, लाकडी हॉकी घेत फिर्यादीच्या जित एम्स सप्लायर्स नावाच्या दुकानात आले. सह आरापी २ याने कामगार अनिश शरद मुरकुटे याच्या हाताच्या मनगटावर लाकडी हॉकीने मारहाण केली. मुख्य आरोपीने फिर्यादीच्या चारचाकी वाहनावरील चालक स्वप्निल अच्युतराव गायकवाड (वय २४ वर्षे, धंदा चालक, रा. के/ऑ., सुमित इंगवले, इंगवले नगर, पिंपळे निलख) याच्या डोक्यावर लाकडी हॉकी मारुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हातातील लाकडी हॉकी, कोयत्याने जित एम्स सप्लायर्स दुकानातील अंडयाच्या ट्रेमधील अंडी फोडुन, नुकसान करुन ‘ कोणाच्या गांडीत दम आहे का? आम्हाला अडवायचा, आम्ही इथले भाई आहोत ‘ असे मोठ-मोठयाने ओरडुन हातातील कोयते, लाकडी हॉकी फिरवुन सह आरोपी ४ ने फिर्यादीच्या दुकानातील काऊंटरच्या ड्राव्हरमधील ४८,००० रुपये रोख रक्कम जबरी चोरी करुन नेली.
तसेच अनिश मुरकुटे याने आणलेली त्याचा मित्र विकी शेरतर याची मोटार सायकल (एम. १२ एन. वाय. ५१०३) हिच्या पुढील बाजुस व मागील बाजुस लाकडी हॉकी, कोयत्याच्या साहय्याने मारुन, तोडुन नुकसान केले व पळुन जात असताना मेन रोडच्या लगत असलेले दुकान चालक गणेश पानकडे यांचा मुलगा स्वराज्य गणेश पानकडे (वय १९ वर्षे, धंदा शिक्षण, रा. के/ ऑ., बंडु इंगवले, शिल्पा हॉटेलजवळ, पिंपळे निलख, विशाल नगर) यास ७ ते ८ जणांनी हातातील कोयते, लाकडी हॉकी, सिमेंटचा चौकोनी गट्टु घेवुन मारण्याचा धाक दाखवत हाताने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ८) रोजी सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास शिल्पा हॉटेलच्या मागे, पिंपळे निलख, विशाल नगर येथील जित एम्स सप्लायर्स नावाच्या दुकानासमोर व दुकानात घडली.
फिर्यादी समीर राजेंद्र इंगवले (वय ३६ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. सुंदर निवास, शिक्षक सोसायटी, इंगवले नगर, पिंपळे निलख) यांनी आरोपी बाबा सैफन शेख (वय २९ वर्षे, रा. राजीव गांधीनगर, पिंपळे गुरव), सोन्या क्षीरसागर, रामा हनुमंत कांबळे (वय २६ वर्षे, रा. विधातेवस्ती, दत्तनगर, बाणेर), अक्षय अहिवळे (सर्व रा. राजीव गांधी नगर, पिंपळे गुरव) व इतर ३ ते ४ इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ८९/२०२३. भा. दं. वि. कलम ३९७, ३०७, ३२३, ४२७, आर्म अॅक्ट ४(२५) (२७), महाराष्ट्र पोलीस अधि. ३७ (१) सह १३५, क्रिमीनल अमेंडमेंट लॉ ३,७ अंतर्गत गुन्हा दाखल करीत मुख्य आरोपी व सह आरोपी ३ याला अटक केली आहे.
















