न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२३) :- कंपनीच्या बसमधुन उतरून फिर्यादी (दि. ७) रोजी रात्री १.०० च्या सुमारास पिंपरीतील जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील ग्रेड सेपरेटर योनेक्स प्रोदुकान समोरील सिमेंटच्या गट्टुवर चढून बीआरटी रोडने चालत जात होते. त्यावेळी आंबेडकर चौकाकडे येत असताना योनेक्स प्रोदुकानासमोर फिर्यादीच्या समोरुन राँग साईडने अॅक्टीव्हा सारखी दिसणारी काळ्या रंगाची गाडी आली. त्या गाडीवर दोन लोक होते. त्यांनी फिर्यादीला गाडी आडवी लावुन, गाडीवरून खाली उतरुन ‘ आम्हाला पैसे दे नाही तर, तुला खुप मारीन ‘ असा दम दिला.
फिर्यादीने त्यांना माझ्या कडे पैसे नाहीत असे सांगितले. त्यावर आरोपी दोघांनी ‘ पैसे दे नाहीतर तुला पुलावरुन फेकुन देईल’ असे म्हणत फिर्यादीच्या पॅटच्या खिशात हात घातला. त्यापैकी काळया टि शर्ट वाल्या इसमाने खिशातील रोख ५,००० रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली. दुसऱ्याने फिर्यादीच्या खिशातील सॅमसंग गॅलक्सी ए ५० एस मॉडेलचा २१,००० रूपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्या मोबाईलवर एक फोन पे नंबर देऊन ७३८७५८७०४९ नंबरवर १४०० रुपये फोन पेद्वारे ट्रान्सफर करुन घेतले. फिर्यादीचा मोबाईल व स्मार्ट वॉच १५०० रुपये किंमतीची हिसकावून नेली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी प्रविण मनोज शिरसाठ (वय २३ वर्षे, धंदा नोकरी, रा. कार्येश्वर मंदिराजवळ करडा रोड, कारेगाव, रांजणगाव) यांनी आरोपी अनोळखी दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी दोघा आरोपींच्या विरोधात २८८/२०२३ भा.द.वि ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


















