न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२३) :- अल्पवयीन मुलगी ही शाळेतून घरी येत होती. दरम्यान आरोपी व्यक्तीने तिला हाताने स्वतःजवळ येण्याचा इशारा केला. तिच्याजवळ जावून तो तिला ‘ तुझी मला पप्पी दे ‘ असे म्हणाला. त्याने मुलीच्या बाल मनास लज्जा उत्पन्न केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ८) रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास अजंठानगर, चिंचवड येथील यशोदा हौ. सोसा., बी, नं. ५, रुम नं ५१६, शेजारील जिन्यामध्ये घडला.
महिला फिर्यादीने आरोपी प्रविण अंकुश म्हस्के (वय ४३ वर्षे, रा. बी, पत्राशेड, रुम २७, अजंठानगर, चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १४४ / २०२३ भा. द. वि कलम ३५४ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ कलम १२ नुसार गुन्हा दाखल करीत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
















