शिवस्वराज्य प्रतिष्ठान आणि शिवसेना शहर संघटक रावसाहेब थोरात यांचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२३) :- छ. शिवाजी महाराजांचा ३९३ वा जयंती उत्सव शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भोसरी विधानसभा शिवसेना शहर संघटक रावसाहेब थोरात यांच्या वतीने चिखली ताम्हाणे वस्तीतील शिवरकर चौकात शुक्रवारी (दि. १०) रोजी श्री शिववंदना, पाळणा गीत आणि विविध उपक्रमांद्वारे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर व उपनिरीक्षक सय्यद, भगवे फेटे परिधान केलेल्या महिलांच्या हस्ते शिव मूर्तीपूजन करण्यात आले. सायंकाळी कीर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई पाटील व आळंदीतील टाळकरी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद आणि १५० महिलांना तुळशी रोपाचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, दत्ता नाना पावळे, सुलभा उबाळे, इरफान सय्यद, धनंजय आल्हाट, संगीता ताम्हाणे, परशुराम आल्हाट, ह.भ.प. स्वातीताई हरकळ, राहुल गवळी, प्रीती तापकीर, प्रवीण भालेकर, रवींद्र सोनावणे, शांताराम भालेकर, निलेश मुटके, सतीश फुगे, नेताजी काशीद, पांडा साने, सचिन सानप, रवींद्र खिल्लारे, प्रवीण तरटे, मनोज जरे, पूनम भालेकर, युराज कोकाटे, सतीश मरळ, सतीश डिसले, सर्जेराव भोसले, काशिनाथ जगताप, पांडुरंग भालेकर, सीमा बेलापूरकर, ज्योती गोफणे, कल्पना शेटे, गौरी घंटे, बाबा गोरे, माणिकशेठ म्हेत्रे, संतोष म्हात्रे, गणेश जाधव, सर्जेराव पोळ, सुजित साळवी यांच्यासह परिसरातील चार हजार महीला, जेष्ठ नागरिक, तरूण मुलं, शिवभक्त, शिवसैनिक आदी उपस्थित होते.


















