न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२३) :- वाहतूक महिला पोलीसांसह मदतनीस म्हणून काम करीत असताना फिर्यादीने दोन महीलांची वाहनं कारवाईसाठी पकडली होती. त्यावेळी दोघे आरोपी महिला वाहतूक पोलिसाला जोरात ओरडत ‘ त्यांना चांगला फाईन मारा ‘ असे म्हणाले. तेव्हा फिर्यादि आरोपीला म्हणाले, ‘ आपल्या घरातसुध्दा महीला असतात, असे बोलू नये ‘. आरोपींना त्याचा राग आला. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन हाताने व हातातील कडयाने तोंडावर मारून जखमी केले.
ही घटना (दि. ९) रोजी सायंकाळी ६.०० चं सुमारास लक्ष्मी चौक, बालाजी टि. सेंटर समोर, हिंजवडी येथे घडली. फिर्यादी सुनिल शिवाजी बिराजदार (वय २३, ट्राफिक वार्डन नोकरी, रा. पंडीत पेट्रोल पंपाजवळ, ज्ञानदा कॉलनी, ताथवडे) यांनी आरोपी वैभव सुदाम दुडे (वय २४ वर्षे, रा. मोकाटेनगर, गणेश अपार्टमेंट, कोथरुड), प्रतीक विजय दुडे (वय २२ वर्षे, रा. सुतार दवाखाना, कोथरुड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी दोघांच्या विरोधात २२५/२०२३ भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४,३४, प्रमाणे गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे.
















