न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२३) :- मंदीराच्या लोखंडी ग्रिल असलेल्या दरवाजाला लावलेले कुलुप उघडुन चोरट्याने मंदीरात प्रवेश केला. मंदीरातील लाकडी पेटीतील लोकांनी दान केलेले २५,००० रोख आणि फिर्यादी यांच्या कपडयामध्ये ठेवलेले १२,७०० रुपये रोख, १०,००० किंमतीचा चांदीचा मोदक व फिर्यादीचा ५,००० रुपये किंमतीचा व्हीव कंपनीचा मोबाईल असा एकुण ५२,७०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरी करून नेला आहे.
ही घटना (दि. ९) रोजी रात्री १०.३० वा. ते (दि. १०) रोजी पहाटे ३.०० च्या दरम्यान गणपती मंदीर, श्री. गुलाब शेलार यांच्या घराच्या बाजुला, ठाकरवस्ती, आकार फाउंड्री कंपनीजवळ, मावळ येथील गणपती मंदीरात घडली.
फिर्यादी संजय वासुदेव ओक (वय ६० वर्षे, पुजारी) यांनी आरोपी अज्ञात चोरटा याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १२१/२०२३ भा.द.वि. कलम ३८०, ४५७ गुन्हा दाखल केला आहे.
















