न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२३) :- अभिनेता अमीर खान का? आणि कशासाठी आलायं, अशी कुजबुज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सुरु होती. नंतर समजले तो आणि पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे हे दोघे मित्र आहेत. मुंबईला जाताना आयुक्तांची भेट घेण्यासाठी अमीर पोलिस आयुक्तालयात आला होता.
रात्री साडेसातच्या दरम्यान अमीर खान पोलिस आयुक्तालयात आला होता. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्यासोबत फोटो काढला. मुंबईत असताना त्यांची आणि माझी ओळख झाली. पुण्यात येणार असल्याने त्यांनी माझी भेट घेतली, अशी माहिती पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिली.
















