न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२३) :- टेम्पो पुसत असताना तिघेजण आरोपी संगणमत करून फिर्यादीजवळ आले. त्यातील एकाने फिर्यादीला कोयता दाखवून ” तुला पण फोडेल, तुझ्याकडील पैसे दे ” असे म्हणत धमकी दिली. फिर्यादी यांनी त्यास प्रतिकार केला असता लाकडी दांडके हातात असलेल्या मुलाने फिर्यादीच्या पाठिवर दांडके मारून शिविगाळ केली. त्यापैकी एकाने फिर्यादीच्या शर्टच्या खिशात जबरदस्तीने हात घालून टेंपोच्या डिझेलसाठी असलेले २००० रुपये व मनगटातील कालवीन क्लेन कंपनीचे घड्याळ जबरदस्तीने काढून घेतले. सोसायटीच्या बाहेर रस्त्यालगत पार्क असलेल्या अंदाजे २६ दुचाकी, चारचाकी वाहनाचे हातातील लाकडी दांडक्याचे व कोयत्याच्या मदतीने काचा फोडुन व वाहनाचे बॉनेट तसेच इतर भागावर मारून चेपवून अंदाजे १,५०,००० रुपयांचे नुकसान केले. सोसायटीतील लोक फिर्यादी यांच्या मदतीला आले असता त्यांना कोयता उगरुन ” आम्ही इथले भाई आहोत आमच्या नादाला जो लागेल त्याचा काटा काढून ” असे धमकावून दहशत निर्माण करीत दोन मोटार सायकलवरून शिवशंभो हौसिंग सोसायटीच्या दिशेने निघुन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ११) रोजी पहाटे ४:०० च्या सुमारास सरस्वती हॉसिंग सोसायटी समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडला. फिर्यादी नानासाहेब संभाजी कांबळे (वय ३८ वर्ष, धंदा-ड्रायव्हर, रामरस्वती हॉसिंग सोसायटी, घारजाई मंदिर, रुपीनगर) यांनी आरोपी दोन मोटार सायकलवरील तीन अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी आरोपींच्या विरोधात १५९/२०२३ भादवि कलम ३९४,४२७५०४/५०६, क्रीमिनल अमेटमेंट अॅक्ट प्रमाने अॅक्ट ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१-३७(१) १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


















