न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२३) :- उसने पैसे घेण्याकरिता फिर्यादी हे आरोपीच्या घरी दुचाकीवरून गेले होते. आरोपी व फिर्यादी हे मित्र असुन फिर्यादीने आरोपीला ४,००० रुपये उसने दिले होते. दरम्यान आरोपी हा फिर्यादीसह दुचाकीच्या मागील सीटवर बसुन मोकळया मैदानामध्ये गेले. त्यावेळी आरोपी हा गाडीवरुन खाली उतरला. त्याने फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी यांनी त्यास विरोध केला असता आरोपीने त्याच्या हातातील फायटर फिर्यादीचे डोक्यावर, डाव्या कानाच्यावर मारुन फिर्यादीस जखमी करीत पळून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि ११) रोजी रात्री १.१५ च्या सुमारास ओंकार कॉलनी, लेन नं. ३ च्या पाठीमागील मोकळया जागेमध्ये घडली.
रोनित विजय खेडेकर (वय २२ वर्षे, धंदा-शिक्षण, रा. ओंकार कॉलनी, लेन नं. ०१, पिंपळे गुरव) यांनी आरोपी रोहित डॅनिअल तोरणे (वय २२ वर्षे रा. ओंकार कॉलनी लेन नं. ०२, पिंपळे गुरव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ९३ / २०२३ भादवी कलम ३२४, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















