न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२३) :- आय टी सॉप्टवेअरच्या क्लासला जाण्यासाठी फिर्यादी हे लाईफ रिपब्लीक सोसायटीच्या गेट समोरील बस स्टॉपवर थांबले होते. त्यावेळी आरोपी हा फिर्यादी जवळ येवून ‘ यह रस्ता हिंजवडी चौक की ओर जाता है क्या? आप उधर ही जा रही हो क्या? ‘ असे म्हणाला. फिर्यादीने त्याला हो म्हणुन सांगितले. परंतु, त्यानंतरही त्याने फिर्यादीस ‘ आप ईधर ही जा रही हो ना, चलो मै आप को छोड देता हूँ ‘ असे म्हणाला.
फिर्यादीला तिकडेच जायचे असल्याने फिर्यादी त्याच्या गाडीत बसले. त्यावेळी ‘ तुम्हे पत्ता है क्या, पुणे में लडकीया क्या करती है ‘ असे म्हणत ‘ मै आप को पाच मिनिट के पाचशे रूपये देता हॅू ‘ असे म्हणत वाईट वाईट शब्दोच्चार व हावभाव करून आरोपी फिर्यादीशी बोलला. फिर्यादी गाडीतून खाली उतरत असताना त्याने फिर्यादीबरोबर अश्लील कृती करून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १२) रोजी सकाळी ९.४५ च्या सुमारास बसस्टॉप ते विगबर स्कुल रस्ता येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी मारूती सुझुकी वॅगनर (जीजे०६जेई०२५१) वरील चालक जसपाल इक्बाल सिंग (वय ४७ वर्षे रा. ए २०२ लाईफ रिपब्लिक सोसा. मारुंजी, मुळशी जि. पुणे; मुळगाव बी / ४ / १३३ सुभानपुरा, वडोदरा, गुजरात) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात २३५/२०२३ भा.दं.वि. कलम ३५४ अ,५०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.















