न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अनेक दिवसांपासून चिंचवडेनगरमध्ये वरून नितळ; मात्र, आतून अशुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. तुरटी गाळल्यानंतर तळाला त्याची घाण जमा होताना दिसत आहे.
अगोदरच वातावरण बदल आणि त्यात या गढूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही समस्या नेहमीची असली, तरी भर उन्हाळ्यात पालिकेकडून होत असणारा पाण्याचा अशुद्ध पाणी पुरवठा नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो. नागरिकांनी तुरटीतूनच पाणी गळून प्यावे, अन्यथा आजारी पडण्याचा धोका संभवू शकतो.















