न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२३) :- सार्वजनिक रस्त्याची जागा सोडण्यावरुन वाद झाला. त्यावरून फिर्यादीला सह आरोपी २ व ४ यांनी वाईट वाईट शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपी १ ने फिर्यादीस पाठीमागुन येवुन सर्वांसमोर मिठी मारली. फिर्यादी या सोड सोड म्हणत असतानाही आरोपी १ ने त्यांना आणखीच आवळून धरले. सह आरोपी ३ ने फिर्यादीस मागे ओढण्याच्या बहाण्याने फिर्यादीचा ब्लाऊज फाडला. आरोपी १ व सह आरोपी ३ यांनी फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन फिर्यादी यांचा विनयभंग केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ११) रोजी सकाळी ११.१५ च्या सुमारास नागेश्वर कॉलनी नंबर २, पुणे नाशिक हायवे, मोशीत फिर्यादीच्या घरासमोर घडला.
महिला फिर्यादीने आरोपी अमोल परदेशी (वय अंदाजे ३२ वर्षे), महिल आरोपी, राजन परदेशी (वय अंदाजे ५२), महिला आरोपी (रा. शिवाजीनगर पोलीस लाईन, शिवाजीनगर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीसांनी आरोपींच्या विरोधात ९०/२०२३ भा.दं.वि. कलम ३५४, ३५४, ३२३, ५०४, ३४ गुन्हा दाखल केला असून अमोल परदेशीला अटक केली आहे.















