न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२३) :- महावितरणमध्ये कार्यकारी अभियंता पदी फिर्यादी हे सप्टेंबर २०२१ पासून कार्यरत आहेत. फिर्यादी हे महावितरण ग्राहक यांचा कायमस्वरुपी विज पुरवठा बंद असलेल्या मिटरची तपासणीचे काम करत होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ व धक्काबुक्की करीत अरेरावीची भाषा वापरली. फिर्यादीचे सहकारी रमेश सुळ यांच्या कारची हवा सोडुन सरकारी कामात अडथळा आणला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १२) रोजी दुपारी २.५५ च्या सुमारास प्लॉट नंबर १२३, अशियाना बिल्डींग, सेक्टर नंबर ४, मोशी प्रधिकरण येथे घडली.
फिर्यादी उदय रामचंद्र भोसले (वय ५६ वर्ष, धंदा-नोकरी (एम एस ईबी), रा. ड्रीम्स रिदम सोसायटी, रो हॉऊस नंबर ६, बावधन) यांनी आरोपी रमेश बाबुराव थोरात (वय ४१ वर्ष, रा. अशियाना बिल्डींग, फ्लॅट नंबर १ सेक्टर नंबर ४, मोशी प्राधिकरण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ९१/२०२३ भा.दं.वि. कलम ३५३,३२३,५०४ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.















