न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२३) :- भोसरीतील आळंदी रस्त्यावरील फुगेवस्ती येथील भोसुरे बिल्डींग मटेरियल अन्ड सॅन्ड सप्लायर्स नावाच्या दुकानात शाब्दीक बाचाबाचीच्या कारणावरुन वाद झाला. त्याची माफी मागण्यासाठी फिर्यादी हे तिथे गेले. फिर्यादीच्या ओळखीचा मित्र आरोपी १ व त्याच्यासोबत असणारे सह आरोपी २ अनोळखी कामगार यांनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने पाठीत व पायावर मारहाण करुन मुक्का मार लागुन जखमी केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ११) रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडला. फिर्यादी ज्ञानेश्वर उर्फ सागर उर्फ बारकु मारुती गवळी (वय ३६ वर्षे, धंदा दुग्ध व्यवसाय, रा. दिघी रोड भोसरी) यांनी आरोपी विजय सतिश भोसुरे (वय ३२ वर्षे, राजवीर होर्सिंग सोसायटी, मंगलमुर्ती मेडीकल शेजारी, आळंदी रोड, भोसरी) व त्याचे २ कामगार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात २१८/२०२३ भा.दं.वि. कलम ३२३,३२४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.















