न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२३) :- ऑनलाईन स्वरुपात फिर्यादीने आरोपीला पैसे दिले होते. फिर्यादी व आरोपी शाळेतील मित्र आहेत. फिर्यादीने दिलेले १०,००० रुपये घेण्यासाठी आरोपी फिर्यादीच्या घरी गेले होते. घरात आरोपीचे आईवडील होते. आरोपी हा घरात नसल्याने फिर्यादीने आरोपीला फोन केला. आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. ‘मी तुझे पैसे देत नाही, तुला काय करायचे ते कर’ असे म्हणून आरोपीने फिर्यादीचा फोन कट केला. पैसे घेतेवेळी आरोपी फिर्यादीला लगेच रोख देतो असे म्हणाला होता. परंतू, आजपर्यत आरोपीने पैसे परत केलेले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १२/१२/२०२१) सकाळी ९.०० च्या सुमारास जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ, चाकण, खेड) येथे घडला. फिर्यादी परेश ज्ञानेश्वर कडेकर (वय २५ वर्षे, व्यवसाय, रा. जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ, चाकण) यांनी आरोपी अक्षय गजानन खोपडे (वय २८ वर्षे, रा. खराबवाडी, चाकण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी २९८/२०२३ भादवी कलम ४०६ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















