न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च) :- राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र कोल्हेंच्या विरोधात प्रचंड असंतोष पहायला मिळत आहे.
भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांच्या समर्थकांकडून कोल्हे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करणारे फ्लेक्स लावले आहेत. त्यात ”आमची ताकद दाखविणार, अमोल कोल्हेंना पाडणार” असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये ‘दुफळी’ पडल्याचे चित्र झाले आहे.











