न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च) :- येत्या २९ एप्रिल रोजी पुणे, बारामती, शिरूर, मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदाना साठी मतदान यंत्रांची तपासणी सुरु आहे.
पिंपरी, चिंचवड आणि मावळ या विधानसभा मतदारसंघानुसार वितरित केली जाणारी मतदान यंत्रे (ईव्हीएम) वखार महामंडळाच्या भोसरीतील गोदामात ठेवली आहेत. त्याची तपासणी केली जात आहे. तपासणी झाल्यानंतर विधानसभा मतदारसंघांनुसार मतदानयंत्रांचे वितरण केले जाणार आहे.











