न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च) :- शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीकडून डॉक्टर अमोल कोल्हे ह्यांच्या नावाची घोषणा होताच, आढळराव यांनी प्रचारसभांना सुरूवात केली आहे.
भोसरीमध्ये झालेल्या सभेत शिवाजीराव आढळराव म्हणाले की, ”मी निधड्या छातीचा मराठा आहे, शिवरायांचा पाईक आहे, मला कुणीही आव्हान देऊ नये”. शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेनेचे निश्चित उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा जातीपातीचे शस्त्र बाहेर काढले आहे.
तसेच मला लढायचा अनुभव आहे. त्यामुळे मला कुणीही शिकवू नये, मला कुणी आव्हान देऊ नये, असेही ते म्हणाले. मला आव्हान देण्यात येत आहे. मात्र मला हे नवीन नाही मी ब-याच जणांना लोळवले आहे आणि ब-याच जणांना पळवून लावले आहे. असेही यावेळी ते म्हणाले











