न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२३) :- काळया रंगाच्या पल्सरवरील अज्ञात दुचाकी चालकाने समोरून आलेल्या अॅक्टीवा (एमएच१४केआर००३९) गाडीला धडक दिली. अपघातात अॅक्टीवावरील चालकाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
फिर्यादीचे पती महादेव बबन कान्हुरकर (वय ४२ वर्ष) असे मयत दुचाकी चालकाचे नाव आहे. आरोपी पल्सरवरील अज्ञात दुचाकी चालक अपघातस्थळी न थांबता भरधाव वेगाने पुढे निघुन गेला. आरोपी हा फिर्यादीच्या पतीच्या मुत्युस कारणीभुत झाला आहे.
ही घटना (दि. १६/०२/२०२३) दुपारी १२.३० च्या सुमारास गणेश साम्राज्य चौक, नाशिक पुणे हायवे येथील सार्वजनिक रोडवर घडली. ३२ वर्षीय महीला फिर्यादी यांनी आरोपी काळया रंगाच्या पल्सर गाडीवरील अज्ञात चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ९५ / २०२३ भा.दं.वि. कलम २७९, ३०४(अ) मोटार वाहन कायदा कलम ११९/१७७, १८४, १३२ (१)(क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















