न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२३) :- युएसए येथे राहणारा फिर्यादीचा मुलगा किर्तीराज याची मुलगी काव्या हिच्यासाठी फिर्यादीने कपडे व स्वीट पार्सलने इन्डोफाईन एक्सप्रेस या कुरीवर कंपनीमार्फत पाठवले होते. पाठवलेल्या कुरीयरचा पत्ता चुकला आहे, असे फिर्यादीला आरोपीने भासवले.
फिर्यादीला लिंक पाठवून त्यावरती पैसे भरा असे सांगितले. फिर्यादीच्या खात्यातुन एकुण १, ६७,९९७ इतक्या रुपयांची आरोपीने फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ३/३/२०२३ ते ५/३/२०२३) दरम्यान एफ ९०१, लोरीया ग्रेस, बावधन खुर्द, पुणे येथे घडला. फिर्यादी शिवाजीराव नारायणराव सरदेसाई (वय ७० वर्षे, धंदा – निवृत्त न्यायाधीश, रा. बावधन खुर्द, पुणे) यांनी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी २४३ / २०२३ भा.द.वि. कलम ४०६, ४२० माहिती तंत्रज्ञान अधिनीयम २००० कलम ६६ सी ६६ डी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


















