न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मार्च २०२३) :- जुन्या भांडणाचा राग मनात धरून ध्रुव खिलारे, विशाल गुंजाळ, रोशन व इतर ४ ते ५ मुलांनी शाळेसमोर बेकायदा जमाव जमवला. फिर्यादी, दर्शन आणि बिलाल अन्सारी यांना आरोपींनी हाताने, लाथाबुक्कयाने मारहाण केली. त्यातील आरोपी विशाल गुंजाळ याने हातात लोखंडी रॉड घेवून फिर्यादीच्या डोक्यात व दर्शनच्या डाव्या हाताच्या कोप-यावर मारून त्यांना गंभीर दुखापत केली. तसेच आरोपी ध्रुव खिलारे याने बिलाल अन्सारीच्या उजव्या कानावर दगड मारून त्याला जखमी केले व इतर आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तिघांना गंभीर जखमी केले.
फिर्यादी हे बिलाल अन्सारी याला आणण्यासाठी मित्र दर्शनसह (दि. १५) रोजी दुपारी १.३० च्या सुमारास आदर्श शाळेच्या गेटसमोर, तळेगाव दाभाडे येथे दुचाकीवर गेले होते. बिलाल हा पेपर संपवून बाहेर आला त्यावेळी हा प्रकार घडला.
फिर्यादी श्रेयस संतोष साळुंखे (वय १७, व्यवसाय शिक्षण, रा. इंद्रायणी कॉलनी, लेन न. ३, रिया रेसीडेन्सी, तळेगाव दाभाडे) याने आरोपी ध्रुव खिलारे, विशाल गुंजाळ, रोशन लोखंडे व इतर ४ ते ५ मुलांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलीसांनी आरोपींच्या विरोधात १२६/२०२३ भा.द.वि. कलम १४३, १४७, १४८,३२६ आर्म अॅक्ट ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















