न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- जुन्या भांडणाच्या कारणावरुन आरोपीने त्याच्या एका साथीदारासह दुचाकीवर फिर्यादीचा पाठलाग केला. आरोपीने त्याची बंदुक फिर्यादीच्या दिशेने रोखुन त्यातून दोन गोळ्या झाडल्या. आरोपीने फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी हे त्यांची दुचाकी केटीएम (एमएच१४एचवाय९५२६) वरून (दि. १८) रोजी रात्री १२.३० च्या सुमारास आळंदीतून चोविसावाडी, च-होली बीआरटी, काटे कॉलनी, बस स्टॉपजवळून वडमुखवाडीतील त्यांच्या घरी जात असताना हा प्रकार घडला.
फिर्यादी सिध्देश सिताराम गोवेकर (वय २८ वर्षे, धंदा – हार फुले विक्री, रा. पद्मावती मंदीराशेजारी, वडमुखवाडी, च-होली) यांनी आरोपी हरी ओम पांचाळ (वय २० वर्षे, दिनानाथ मंगल कार्यालय शेजारी, वडगाव रोड, आळंदी देवाची), हरीओमचा साथीदार अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी दोघांच्या विरोधात १०९/२०२३ भादवि कलम ३०७, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ०३. (२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















