न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरून व लपूनछपून होणारा प्रतिबंधित गुटखा विक्री, साठवणुक व वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध व्हावा यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उप आयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे व सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ पदमाकर घनवट व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सतिश पवार, अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार तपास पथकाने पुनावळे येथे कारवाई करीत एकुण ४४,४२,०४९ रुपये किंमतीचा वेगवेगळया कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा जप्त केला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील वपोनि सतिश पवार, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अमलदार हे (दि. १९) पुनावळे येथील इला सोसायटी समोर आले असता पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे व मितेश यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. पुनावळेमधील गायकवाड वस्तीतील स्मार्ट बाजार दुकानाच्या मागे असलेल्या पत्राचे शेडमध्ये एका इसमाने लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री करीता साठवणुक करुन ठेवला आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. महेंद्रकुमार कान्हाराम परमार (वय २५ वर्षे, रा किर्ती क्लासिक गेट, लक्ष्मी चौक, हिंजवडी पुणे- येथे भाड्याने; मुळ रा. पाचेटिया, तहसिल मारवा जन्शन, जिल्हा पाली राज्य राजथस्थान) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकुण ४४,४२,०४९ रुपये किंमतीचा वेगवेगळया कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु व पानमसाला व मोबाईल असा माल जप्त केला आहे. हा माल कैलास राठोड व महेंद्र राठोड (रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी, मुळगाव; राजस्थान) यांचा असल्याचे आरोपीने सांगितले. तीन जनांविरुध्द रावेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगीरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश पवार, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अंमलदार, सपोफी बाळासाहेब सूर्यवंशी, पोहवा प्रदिप शेलार, पो.हवा. संतोष दिघे, पो.हवा. संदीप पाटील, पोहया आनंद बनसोडे, पोना मनोज राठोड, पोना मयुर वाडकर, पोना विजय दौंडकर, पोशि रणधीर माने, पोशि मितेश यादव, पोशि सदानंद रुद्राक्षे, पोशि अशोक गारगोटे यांनी केली आहे.