न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२३) :- दापोडीतील मुस्लिम दफनभुमीसमोरील नदीच्या किनाऱ्याजवळील नाल्यामध्ये आरोपीने (दि. २०) रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास ट्रॅक्टर (केए३३टीए७२५०) मधुन आणलेला पालापाचोळा व राडारोडा नाल्यामध्ये टाकला. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.
याप्रकरणी सचिन गुलाबराव जाधव (वय ४३ वर्षे, धंदा आरोग्य निरीक्षक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ह प्रभाग, कासारवाडी) यांनी आरोपी विजय रामु चव्हाण (वय २४ वर्षे, रा. बालाजी चौक, पाषाण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी २३८/२०२३ सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















