न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२३) :- बेकायदेशिरपणे हातभट्टीची दारु तयार करण्याकरीता लावलेले गुळ मिश्रित कच्चे रसायण जमीनीच्या खडयामध्ये व लोखंडी पात्रामध्ये भिजत घातल्याची माहिती शिरगांव-परंदवडी पोलीसांना मिळाली.
पोलिसांनी (दि. २०) रोजी दुपारी १.३० वाजता शिरगावच्या हददीत पवना नदीच्याकडेला मोहन अरगडेच्या शेताजवळील मोकळया जागेत व कंजारभट्ट वस्तीच्या पुर्वेस पुणे-मुंबई एक्सप्रेस रोडजवळ कारवाई केली.
महिला आरोपी (वय ४३ वर्षे), महिला आरोपी (वय ४५ वर्षे), महिला आरोपी (वय ४५ वर्ष), महिला (वय ४३ वर्षे, सर्व रा. शिरगाव कंजारभटट वस्ती, ता. मावळ, जि. पुणे) यांच्यावर ८४/२०२३ महा दारुबंदी अधिनियम कलम ६५ (सी), (एफ), ८३ दि. २०/०३/२०२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तब्बल ४,८१,००० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
















