न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२३) :- १७ वर्षीय अल्पवयीन मोठ्या मुलीसोबत आरोपी आईने भांडण केलं. मोठ-मोठ्याने आरडा-ओरड करीत हातातील लाटण्याने मुलीच्या दोन्ही हातावर, दोन्ही पायावर, गुडघ्यावर, घोटयावर, छातीत, बरगडीवर आणि डोक्याला मारहाण करून गंभीर जखमी केलं.
हा प्रकार (दि. १२) रोजी रात्री ८.३० च्या सुमारास व्यंकटेश्वर निवास, स.नं.४०/१, भुजबळ पारखेवस्ती, वाकड येथे घडला. आरोपी महिलेच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात २७२/२०२३ भा.द.वि. कलम ३०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















