- तंबाखुजन्य पदार्थ आणि इंर्पोटेड सिगारेट जप्त; दोघे अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२३) :- पिंपळे निलख येथील डीपी रोड, विशालनगरमधील ओम साई पान शॉप आणि भूमिका पान स्टोअर्सवर गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने (दि. १९) रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास कारवाई केली. कारवाईत बेकायदेशिरपणे विक्रीकरिता स्वतः जवळ बाळगलेला ६१८२ रुपये किमतीचा सुगंधी तंबाखुजन्य पदार्थ आणि १०,०२५ रुपये किंमतीचा प्रतिबंधीत इंर्पोटेड सिगारेट (वैधानिक इशारा न लिहिलेली) पोलिसांनी जप्त केली.
सांगवी पोलिसांनी आरोपी विरोधात १०८/२०२३ भा.द.वि. कलम ३२८,२६९,२७०,२७२,२७३.१८८ तंबाखुजन्य जाहिरात प्रतिबंध कायदा २००३ चे कलम ७,२० अन्वये दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
सचिन वैजनाथ डोंगरे (वय ३२ वर्षे, रा- ओम साई पान शॉप, डी पी रोड, विशाल नगर, पिंपळे निलख, पुणे, मुळ रा-मु. पोदेवणी, ता- देवणी, जि लातुर), प्रेम सागर ऊर्फ रज्जु लक्ष्मी यादव (वय २२ वर्षे, तेजस्वीनी हाऊसिंग सोसायटी, फ्लॅट नंबर ३०१, आँध पुणे, मुळ रा- कमासिन बांदा, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
















