न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२३) :- ऑफीसमध्ये साफसफाईचे काम करणाऱ्या फिर्यादी महिलेने आरोपीकडे तीन महीन्याचा पगार मागितला. त्या कारणावरुन आरोपीने फिर्यादीला अश्लील व जातीवाचक शिवीगाळी केली. फिर्यादी यांची ओढणी ओढुन फिर्यादी यांना डाव्या हाताने पकडुन उजव्या हाताने फिर्यादीच्या तोंडावर, नाकावर जोराने बुक्क्या मारल्या. फिर्यादीची ओढणी खाली पडुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन फिर्यादी यांचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि.२१) रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास एसआरसी ट्रान्सपोर्ट ऑफीस बाहेर, सिटीप्राईड कॉम्प्लेक्स, आकुर्डी येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी हर्षद कमाल खान (वय अंदाजे २३ वर्ष, रा. स्पाईन रोड, चिखली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी १६६/२०२३ भा. द. वि कलम ३५४, ३२३, ५०४, प्रमाणे सह अनुसुचित जा. ज. प्रतिबंधक कायदा कलम-१९८९ कलम-३(१)(आर) (एस), ३(१) (डब्ल्यू) (I) (II) प्रमाणे आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















