न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२३) :- ऑफिसमध्ये बैठक संपत असताना मुख्य ठेकेदार कुणाल भोसले यांच्यासोबत आलेला आरोपी फिर्यादीची परवानगी नसताना फिर्यादीच्या दालणात जबरदस्तीने आला. फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन केले. फिर्यादीला अर्वाच्य भाषेत आई बहीणीवरुन शिवीगाळ केली. फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
‘मी तुम्हाला बघुन घेतो’ असा आरडा ओरड करुन गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. फिर्यादीला मानसिक त्रास दिला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, आकुर्डी येथील ६ व्या मजल्यावर मुख्य अभियंताच्या दालनामध्ये घडला.
फिर्यादी अशोक मारुतीराव भालकर (वय- ५५ वर्ष, धंदा- नोकरी, रा- फ्लॅट नं- ७०२, राजप्रासाद अपार्टमेंट, भोसलेनगर, भांबुर्डा, शिवाजीनगर) यांनी आरोपी रामचंद्र जगताप (वय अंदाजे ४५ वर्ष, पुर्णनाव पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १६५/२०२३ भा.द.वि.स. कलम ३५३, ५०४, ५०६, ५०७, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















