न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२३) :- स्कुल बस थांबवुन फिर्यादीच्या नातीला आरोपी स्कुलबस चालकाने एकटीलाच बसमधुन उतरवले. तिच्यासोबत चालत तिला आडबाजुला खडयात नेले. तिच्याशी अश्लील कृत्य करीत तीचा विनयभंग केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २०) रोजी दुपारी १.१५.ते २.२० च्या दरम्यान दाभाडे सरकार चौक, च-होली बु।। येथे घडला. महिला फिर्यादीने रिव्हर डेल स्कुल, केळगाव, खेड येथील स्कुलवरील बसचालक आरोपी प्रशांत सखाराम आंत्रे (वय ३४ वर्षे, रा. अभिमान श्री सोसायटी, थोरवे वस्ती, च-होली फाटा) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी ११०/२०२३ भा.द.वि.क. ३५४ (अ), ३५४ (ब), पोक्सो अधिनियम-२०१२ चे कलम ११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.
















