न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२३) :- घरासमोर फिर्यादी महिला जेवण करत बसली होती. त्यावेळी आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर येवुन त्यांच्याजवळ थांबला. त्यांच्याकडे वाईट नरजेने बघुन इशारा करु लागला. तेव्हा फिर्यादी त्यास ‘तु क्यु इधर आया है’ असे म्हणाल्या. ‘ तु मुझे बहुत अच्छी दिखती है, इसलिए आया ‘ असे आरोपी फिर्यादीला म्हणाला. त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील हावभाव करीत आरोपीने फिर्यादीच्या उजव्या खांद्यावरुन हात फिरवत त्यांचा विनयभंग केला.
फिर्यादीने त्यास विरोध केला असता त्याने तिला ढकलुन दिले. तेव्हा फिर्यादीची आई तेथे आली. आरोपीला ‘तु क्यो मेरे लडकी के पिछे पडा है’ असे म्हणाल्या. आरोपीने फिर्यादीचच्या आईस हाताच्या चापटीने व लाथाने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १५) रोजी दुपारी ३.०० ते (दि. १९) रोजी रात्री १०.३० वाजता नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर येथे घडली. महिला फिर्यादी यांनी जाकिर सय्यद (नागसेननगर, बिजलीनगर, झोपडपट्टी चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १३३/२०२३ भा.द.वी. कलम ३५४,३५४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .
















