न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२३) :- गहाळ झालेल्या एकुण १७ मोबाईलचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी शोध घेतला. वनप्लस, सॅमसंग, ओपो, अशा महागड्या कंपनीचे एकूण २,२०,००० रुपयांचे मोबाईल भोसरी पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १ विवेक पाटील यांच्या हस्ते (दि. २१) रोजी भोसरी पोलीस ठाण्यात गहाळ झालेल्या एकुण १७ मोबाईल तक्रारदार यांना परत देण्यात आले आहेत.
ही कामगिरी विवेक पाटील पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १, प्रेरणा कट्टे सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, भास्कर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पो.ठाणे, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सागर जाधव यांनी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन सपनि कल्याण घाडगे, पोउपनि मुकेश मोहारे, सफो राकेश बोयणे पोलीस अंमलदार हेमंत खरात, नवनाथ पोटे, धोडिराम केंद्रे आशिष गोपी, प्रभाकर खाडे, संतोष महाडिक, तुषार वराडे, सचिन सातपुते, स्वामी नरपडे, महिला पोलीस अमलदार प्रतिभा मुळे यांनी सदरची उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.
















