- गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई; तीन गुन्हे उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२३) :- साथीदारासह दुचाकीवर येवून फिर्यादी सिध्देश गोवेकर (रा. वडमुखवाडी) चा पाठलाग करून आरोपी हरीओम पांचाळ (वय २० वर्षे) याने बंदुक फिर्यादीच्या दिशेने रोखुन दोन गोळया झाडुन फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दिघी पोलीस ठाणे गु.र.नं. १०९/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७,३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३.२५ प्रमाणे गुन्हा दाखल होता. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्हे शाखेकडील सर्व तपास पथकांच्या वेगवेगवेगळे तपास टिम तयार करुन तपास पथकांना गुन्हयातील आरोपींना अटक करण्याबाबत योग्य त्या सुचना केल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीन ने ४८ तासामध्ये आरोपीला अटक केली आहे.
गुन्हे शाखा युनिट ३ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोशि/ २३९९ बाळसराफ, पोशि/२२९६ जैनक, पोशि/१२८१कोळेकर, पोशि/२८७७ मेगरळ, पोशि/ १९४० हनमंते, पोशि/२००१ नांगरे, पोशि/२८८३ काळे यांनी वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हयाचा समांतर तपास केला. गुन्हयातील पाहीजे आरोपी हरी ओम पांचाळ (रा. दिनानाथ मंगल कार्यालया शेजारी मडगाव रोड आळंदी देवाची ता. खेड जि.पुणे) याचा शोध घेत असताना पोशि२० पोशि/१२८१ कोळेकर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली. गुन्हयातील आरोपी हा दुचाकीसह बाहेर गावी पळून जाण्याच्या तयारीत असून तो अलकापुरम रोड, वडमुखवाडी ते खड़ी मिशिनकडे जाणाऱ्या रस्त्याने जाणार आहे, अशी अशी खात्रीशिर बातमी मिळाली. आरोपीस सापळा रचुन शिताफीने गुन्हे शाखा युनिट ३ कडील तपास पथकाने ताब्यात घेतले. त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने हा गुन्हा त्याचा मित्र मुद्रा शेख (रा.काळे कॉलनी, चऱ्होली) याच्यासह मागील झालेल्या भांडणाचे कारणावरुन केल्याची कबुली दिली. त्याच्या अंगझडतीमध्ये त्याने गुन्हयात वापरलेले एक पिस्तोल व ०१ जिवंत काडतूस, गुन्हयात वापरलेली दुचाकी तसेच मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. त्याचेकडील मोबाईलबाबत दिघी पोलीस ठाणे गु.र.नं.330/2021 भा.दं.वि. कलम 300 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दिघी पोलीस ठाणे गु.र.नं. १०१/२०१३..लम ३०७,३४ राह भारतीय हत्यार कायदा कलम ३.२५, विधी पोलीस ३३०/२०२१ ३०० असे दोन गुन्हे उघडकीस आले. आरोपीना पुढील कारवाईकामी दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अपर आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत पोलीस अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार सचिन मोरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधिर दांगट, शशिकांत नांगरे, समीर काळे, रामदास मेरगळ, महेश भालचिम, निखिल फापाळे, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे.
















