न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कचरा गाडीवर आरोपी नोकरीस आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. आरोपी हा मयत महिला (वय ५८ वर्षे, रा. निराधार नगर, पिंपरी) यांचा मुलगा आहे. ते दोघे राहण्यास एकत्र होते.
दरम्यान आरोपी कामावर न जाता घरीच असल्याने मयत महिलेने त्याला कामावर का गेला नाही? याची विचारणा केली. दारुचे व्यसन सोडण्यासाठी सांगितले. त्याचा राग मनात धरुन आरोपीने घराबाहेरुन सिमेंटचा गटटु आणुन मयत महिलेच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर दुखापत केली. महिलेच्या मेंदुत रक्त स्त्राव होवुन व श्वसन क्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ९) रोजी रात्री ८.०० वाजता निराधार नगर, सायली कॉम्पलेक्स समोर, भाटनगर, पिंपरी येथे घडला. पिंपरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३२४/२०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. विश्वास अशोक शिंदे (वय ३० वर्षे, रा. निराधार नगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
















