न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- दोन कामगारांसह फिर्यादी हे त्यांच्या कटींग सलुनच्या दुकानामध्ये काम करीत होते. त्यावेळी आरोपी दोघेजण तिथे आले. त्यांच्यापैकी सह आरोपी २ याने फिर्यादीला त्याचा चेहरा फ्रेश करुन देण्यास सांगितले. फिर्यादीने त्याचा चेहरा फ्रेश करुन दिला. त्याचे २० रुपये मागीतले. त्यावेळी आरोपी “ तु माझ्याकडे पैसे मागतोस का, तु आम्हाला ओळखत नाही का, थांब तुला दाखवतो.” असे म्हणाला.
फिर्यादीस हाताने व लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपी १ याने दुकानाच्या बाहेर जावुन एक लोखंडी पाईप आणला. तो पाईप सह आरोपी २ याच्याकडे दिला. त्या लोखंडी पाईपने फिर्यादीच्या कटींग सलुन दुकानातील सर्व काचा फोडुन, ट्रॉली तोडुन, मशीनी तोडुन नुकसान केले. त्यानंतर त्या दोघांनी फिर्यादीच्या दुकानातील पैश्याचे ड्रॉव्हर मधुन रोख रक्कम १४०० रुपये जबरदस्तीने चोरुन घेतले व आरोपी १ याने फिर्यादीला पोलीस कॅम्लेट केली तर तुझी विकेट टाकीन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २१) रोजी सायंकाळी ६.०० च्या सुमारास स्वामी विवेकानंद ब्रिज जवळ, गल्ली नं. २, शरदनगर, चिखली येथील ट्रेंडस सलुन या कटींग सलुन दुकानामध्ये घडली.
फिर्यादी भुषण लक्ष्मीकांत महाले (वय २६ वर्षे, धंदा. कटींग सलुन दुकान व्यवसाय, रा. सचिन बी-४, मणीकांचन सोसायटी, कृष्णानगर, चिंचवड) यांनी आरोपी आदर्श ऊर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर (वय २२ वर्ष, रा पंचवटी हौ सोो, गल्ली नं यश प्लाझा जवळ, शरदनगर, चिखली), आदित्य शिंदे (रा. दोघेही गल्ली नं. २, शरदनगर, चिखली) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी १७९ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९४, ३२३, ५०६ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
















